गंगापूर, (प्रतिनिधी) : अखिल भारत हिंदू महासभेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी भाऊसाहेब चव्हाण पाटील यांची नियुक्ती केली आहे.
महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण राजेंद्र चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र १७ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आले. भाऊसाहेब चव्हाण पाटील यांच्यावर महाराष्ट्रातील संघटनेची प्रमुख संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेची एकता, सामाजिक सलोखा, सांस्कृतिक मूल्यांचे जतन तसेच सामूहिक प्रगतीसाठी कार्य करण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल भाऊसाहेब चव्हाण पाटील यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अखिल भारत हिंदू महासभेची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, असा विश्वास मराठवाडा अध्यक्ष संदीप पाटील आढाव आणि जिल्हाध्यक्ष कृष्णा पाटील पराड यांनी व्यक्त केला.














